काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

0
237

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात गुरूवारी रात्री सुरक्षा जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यातील एक दहशतवादी पाकिस्तानचा तर दुसरा महाविद्यालयीन विद्यार्थी होता. आमीर सिराज हा महाविद्यालयीन विद्यार्थी होता व तो फुटबॉल खेळाडू होता. आमीर हा २ जुलै २०२० पासून बेपत्ता होता. दोघांचेही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. आमीर सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. आमीर फुटबॉल खेळण्यासाठी सोपोर येथील मामाच्या घऱातून बाहेर पडला तेव्हापासून बेपत्ता होता. नंतर तो जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळाली. आमीरचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता.

बारामुल्ला येथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी दहशतवादी घरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. पण दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. त्यात आमीरसह आणखी एक दहशतवादी मारला गेला. गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या अनेक स्थानिकांना सुरक्षादलाच्या जवानांनी पुन्हा घरी आणण्यात यश मिळवले आहे. तशी संधी आमीर यालाही देण्यात आली होती पण त्याने नकार दिला होता.