नॉर्वेचा विश्वविजेता खेळाडू मॅग्नस कार्लसन याने २५०,००० मॅग्नस कार्लसन निमंत्रितांच्या ऑनलाईन स्पर्धेच्या घवघवीत यशानंतर ‘मॅग्नस कार्लसन टूर’चा भाग म्हणून अजून चार ऑनलाईन स्पर्धांची घोषणा केली आहे.
लिंडोरेस एबे रॅपिड चॅलेंज (१९ मे ते ३ जून, १५०,००० युएस डॉलर्स), ऑनलाईन चेस मास्टर्स (२० जून ते ५ जुलै, १५०,०००), लिजंड्स ऑफ चेस (२१ जुलै ते ५ ऑगस्ट, १५०,०००) व टूर फायनल (९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट, ३००,०००) अशा या स्पर्धा असतील. पहिल्या स्पर्धेत पहिल्या चारांत राहणारे खेळाडू पुढील स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहेत. त्यामुळे निमंत्रितांच्या स्पर्धेतील कार्लसन, हिकारू नाकामुरा, डिंग लिरेन व अलीरेझा फिरोझा हे १९ पासून सुरु होणार्या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरले आहेत. वेस्ली सो, आलेक्झांडर ग्रिश्चुक, सर्जेई कर्जाकिन, लेवोन अरोनियन, वेई यी, डानिल दुबोव, जॉन क्रिस्टोफ डुडा व यू यांगशी हे या स्पर्धेतील इतर खेळाडू असतील. टूर फायनलमध्ये प्रत्येक स्पर्धेतील विजेता खेळाडू सहभाग घेईल. लहशीी२४.लेा या संकेतस्थळावर संपूर्ण टूरचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.