मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात नोव्हेंबर 2023 मध्ये सहभागी झालेल्या कायदा तथा पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी पर्वरी येथील मंत्रालयातील आपल्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्क्रीन बसविली आहे. आपल्या सरकारी केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि स्क्रीन बसविणारे सिक्वेरा हे पहिले मंत्री ठरले आहेत.
आपणाला यापूर्वी एका कटू प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमुळे आपण निरपराध असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुन्हा कटू प्रसंगांना तोंड द्यायला लागू नये म्हणून आपण केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आपला कारभार नेहमी पारदर्शक असतो. सीसीटीव्हीच्या माध्यमातून केबिन आणि कार्यालयात ये-जा करणाऱ्यांचे पूर्ण रिकोर्डींग केले जात आहे, असे सिक्वेरा यांनी सांगितले.