काणकोण येथे अपघातात १ ठार, चार जखमी

0
260

कारवार मार्गे गोव्यात यायला निघालेल्या एका कारला काल तीन रोजी मध्यरात्री भगतवाडा काणकोण येथे झालेल्या एका भीषण अपघातात कारमधील एका महिलेचे निधन झाले तर चालकासहित अन्य चौघे जखमी झाले.
काणकोणच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील व्यक्ती मूळ वार्का मडगाव येथील असून एकाच कुटुंबातील आहेत. मंगळुरू येथील आपल्या नातेवाईकांकडे जाऊन परत येत असता कारचालकाचा वाहनावरील ताबा गेल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. जखमी अवस्थेत तिला मडगावच्या इस्पितळात उपचारासाठी पाठविले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. मृत महिलेचे नाव मिलाग्रिना रिबेलो (४९) असे असून या अपघातात जखमी झालेल्यांची नावे योजन रिबेलो (५८) नैनिका रिबेलो (२१) अनली रिबेलो (१७) आणि कार चालक अलिसन बरिबेलो (२५) अशी आहेत. काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यानी पंचनामा करून पुढील तपास चालू केला आहे.