काणकोणमधील तरुणास अटक

0
88

>> विदेशी तरुणी खूनप्रकरण

 

देवाबाग-काणकोण येथे निर्जनस्थळी परदेशी युवतीच्या खून प्रकरणी भगतवाडा-काणकोण येथील युवक विकट भगत याला काणकोण पोलिसांनी अटक केली असून ७ दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे.
सदर युवकाच्या घरी त्याच्या गाडीच्या डिकीत रक्ताचे डाग मिळाल्याचे तसेच त्याच्यावर अनेक तक्रारी पोलीस स्थानकात नोंद असल्याचे पोलीस उपअधीक्षक सॅमी तावारीस यांनी काणकोण पोलीस स्थानकावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
डेनियल मॅक्लून असे मयत युवतीचे नाव असून मंगळवारी माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सॅमी तावारीस व काणकोणचे पोलीस निरीक्षक ङ्गिलोमेना कॉस्ता यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर विकट भगत या संशयिताला ताब्यात घेतले होते.
दरम्यान, आयरिश युवतीचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला होता. त्या ठिकाणी परदेशी नागरिकांनी आपल्या एकजुटीचे दर्शन घडविताना मयत डेनियल मॅक्लून हिला
मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहिली. मयत तरुणीच्या खुनामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण काणकोण तालुक्यात निर्माण झाले आहे. सदर युवतीच्या खून प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी विदेशी पर्यटकांकडून होत आहे.