कांगारूंना जाणवणार स्मिथची अनुपस्थिती

0
111

ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून खेळविला जाणार आहे. दुखापतग्रस्त स्टीव स्मिथच्या अनुपस्थितीत जोफ्रा आर्चर अँड कंपनीला रोखणे कांगारूंना सोपे जाणार नाही. स्मिथच्या अनुपस्थितीत अनुभवी डेव्हिड वॉर्नरला स्वतःच्या खांद्यावर अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असूनही दुसर्‍या कसोटीतील कामगिरीमुळे इंग्लंड संघाचा आत्मविश्‍वास दुणावला असून मालिकेत बरोबरीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. सलामीवीर कॅमरून बॅन्क्रॉफ्ट दबावाखाली असून या कसोटीत न खेळल्यास मार्कुस हॅरिसला संघात जागा मिळू शकते. दुसर्‍या कसोटीत खेळविलेला संघच इंग्लंड तिसर्‍या सामन्यात उतरवणार आहे. दुसरीकडे मार्नस लाबुशेन स्मिथची जागा घेणे अपेक्षित आहे. विश्रांतीनंतर जेम्स पॅटिन्सन संघात परतणार असल्यामुळे जोश हेझलवूडला बाहेर बसावे लागू शकते.

सामन्याची वेळ
दुपारी ३.३०

इंग्लंड संभाव्य ः रॉरी बर्न्स, जेसन रॉय, ज्यो डेन्ली, ज्यो रुट, जोस बटलर, बेन स्टोक्स,जॉनी बॅअरस्टोव, ख्रिस वोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर व जॅक लिच.
ऑस्ट्रेलिया संभाव्य ः डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बॅन्क्रॉफ्ट, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टिम पेन, पॅट कमिन्स, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल व नॅथन लायन.