काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत 57 उमेदवारांची नावे जाहीर

0
15

काँग्रेसने गुरुवारी लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात 7 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 उमेदवारांची नावे आहेत. तीनही याद्यांसह काँग्रेसने आतापर्यंत 139 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तिसऱ्या यादीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना पश्चिम बंगालच्या बरहामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

तिसऱ्या यादीत गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगाणा, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील उमेदवार जाहीर केला आहे. तिसऱ्या यादीत अरुणाचलमधील 2, गुजरातमधील 11, कर्नाटकातील 17, महाराष्ट्रातील 7, राजस्थानमधील 6, तेलंगणामधील 5, पश्चिम बंगालमधील 8 आणि पुद्दुचेरीतील 1 उमेदवार जाहीर केला आहे.

तिसऱ्या यादीतही गोव्यातील उमेदवार नाहीत
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली; मात्र त्या गोव्यातील दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश नव्हता. त्यामुळे भाजपप्रमाणेच काँग्रेसची उमेदवार निवड देखील लांबणीवर पडत चालली आहे.