कसोटीतील अव्वलस्थान विराटच्या दृष्टिपथात

0
87

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात २५४ धावांची नाबाद खेळी केलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळविण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. विशाखापट्टणम पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीचे गुण कमी होऊन ८९९ पर्यंत खाली आले होते. पुणे कसोटीतील द्विशतकाच्या बळावर विराटने ३७ गुणांची कमाई करत आपली गुणसंख्या ९३६ केली आहे.

प्रथम स्थानावरील स्टीव स्मिथचे ९३७ गुण आहेत. टीम इंडियाचा कसोटी सलामीवीर मयंक अगरवाल याने दुसर्‍या कसोटीतील भारताच्या एकमेव डावातील १०८ धावांमुळे आठ स्थानांची सुधारणा करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम १७वे स्थान आपल्या नावे केले आहे. चेतेश्‍वर पुजारा (४) व अजिंक्य रहाणे (९) हे टॉप १० मधील अन्य भारतीय फलंदाज आहेत.

ऑफस्पिनर रविचंद्रन अश्‍विन याने आपला चढता आलेख कायम ठेवताना तीन स्थानांची उडी घेत गोलंदाजी क्रमवारीत सातवे स्थान प्राप्त केले आहे. अष्टपैलूंमध्ये वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डरनंतर भारताचा रवींद्र जडेजा दुसर्‍या स्थानी आहे. या यादीत अश्‍विनचा पाचवा क्रमांक लागतो.