कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी 1 हजार कोटींचा निधी मंजूर

0
5

>> गृहमंत्री अमित शहांचे हुबळीत म्हादईवर भाष्य

>> फोंड्यातील प्रचारसभेत मात्र बाळगले होते मौन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी-फोंडा येथे आयोजित भाजपच्या जाहीर प्रचारसभेत म्हादईप्रश्नी कोणतेही भाष्य केले नव्हते; मात्र शहा यांनी काल हुबळी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत म्हादईवर भाष्य केले. केंद्र सरकारने म्हादई नदीवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी 1 हजार कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे, अशी माहिती शहा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

केंद्र, गोवा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार असताना म्हादई पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कोणताही प्रयत्न करण्यात आला नाही. उलट, काँग्रेस पक्षाने 1980 मध्ये म्हादई पाणीप्रश्नी आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार केला होता, असा दावा शहा यांनी केला.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हादई जलतंटा प्रश्नी सर्वांना विश्वासात घेऊन म्हादई प्रश्न सोडविण्यात यश प्राप्त केले आहे. हुबळी येथील जलसिंचन योजनेसाठी 5300 कोटी रुपये अशी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असेही शहा यांनी सांगितले.