Home बातम्या कळंगुट येथील हॉटेल महादेवची नोंदणी रद्द

कळंगुट येथील हॉटेल महादेवची नोंदणी रद्द

0

आगशी येथील दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पर्यटन खात्याने कळंगुट येथे महादेव नामक एक हॉटेलची नोंदणी रद्द केली आहे. आगशी येथील तीन अल्पवयीन मुलींना कळंगुट येथील हॉटेलमध्ये नेऊन तेथे दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी आगशी पोलिसांनी दोन युवकांना अटक केली आहे. तसेच, आगशी पोलिसांनी कळंगुट येथील त्या हॉटेलच्या मालकाविरुद्ध कळंगुट पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीला अनुसरून हॉटेलच्या मालकाला अटक करून हॉटेल सीलबंद केले आहे. पोलिसांनी सदर हॉटेलची नोंदणी रद्द करण्यासाठी संबंधित पर्यटन खात्याकडे अर्ज केला होता. सदर हॉटेलची पर्यटन व्यवसाय कायद्याखाली नोंदणी करण्यात आली आहे.