कर चुकवेगिरी करणार्‍यांवर कडक कारवाई

0
48

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा, आल्तिनो येथे कर भवनाचे उद्घाटन

रवाई केली जाईल, असा इशारा देतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी,कर चुकवेगिरी करणार्‍यांनी नंतर सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी करचुकवेगिरी केलेल्या दोघा उद्योजकांना अटक करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी वरील इशारा दिला. १९ कोटी रु. खर्चून बांधलेल्या आल्तिनो येथील गोवा राज्य कर भवनचे काल शुक्रवारी उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव परिमल राय, वित्त खात्याचे प्रधान सचिव पुनीत कुमार गोयल, कृषी सचिव चोखाराम गर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेच्या दरम्यान राज्य सरकारच्या महसुलात तब्बल ५० टक्के एवढी घट झाल्याची माहिती यावेळी काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. तर पहिल्या लाटेच्यावेळी केवळ १० टक्के एवढाच महसूल प्राप्त झाला होता, असे ते म्हणाले. राज्यात २०१६ साली जेव्हा सेवा व वस्तू कर लागू करण्यात आला तेव्हा करदात्यांची संख्याही २८ हजार एवढी होती. आता ती ४३ हजार एवढी झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जीएसटी व अबकारी खात्याची कार्यालये ह्या इमारतीत हलवण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
कोरोना महामारीमुळे लोकांवर ओढवलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन वस्तू आणि सेवा करात आवश्यक तेवढी सवलत देण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सुमारे ४ हजार चौ. मी. एवढ्या जागेत हे कर भवन उभारण्यात आलेले असून कर खात्यांत काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ह्या इमारतीच्या रुपाने चांगली साधन सुविधा निर्माण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.