कर्नाटकात भारत जोडो यात्रेत चौघांना विजेचा धक्का

0
9

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काल बळ्ळारी कर्नाटकमध्ये घडलेल्या एका घटनेत या यात्रेतील ४ कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसला आहे. या सर्वांवर प्राथमिक उपचार करून इस्पितळात भरती करण्यात आले आहे. ही दुर्घटना काल रविवारी सकाळी घडली. या ठिकाणी काल यात्रेची सुरुवात झाली होती.

मौका नावाच्या गावात ही यात्रा पोहोचली असता काही कार्यकर्त्यांना विजेचा धक्का बसला पक्षाचा झेंडा घेतलेले कार्यकर्ते निपचित पडल्याने सुरवातीला गोंधळ उडाला. मात्र, एक तार दिसल्यानंतर नेमका प्रकार लक्षात आला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि रुग्णवाहिकेतून जखमींना रुग्णालयात पाठवले. कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली असून ३७५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्यानंतर हा प्रवास जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये संपेल. यात्रेत सहभागी असलेले सर्व सदस्य या कालावधीत १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहेत.