काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी मंगळवारी म्हैसूरमधील सभेतून कर्नाटकातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्नाटकातील भाजप सरकार हे 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. भाजप सरकार अतिशय निर्लज्जपणे आणि निर्दयीपणे सर्वसामान्यांना लुटत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. कर्नाटकातील भ्रष्टाचारावरून अनेकांनी पंतप्रधानांना पत्रे लिहिली. मात्र पंतप्रधान यावर मौन बाळगून असल्याचे त्या म्हणाल्या. कर्नाटकातील भाजप सरकारमध्ये प्रत्येक प्रकारचा घोटाळा सुरू आहे. याविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिण्यात आले. मात्र काहीच कारवाई झाली नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.