कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना कोरोना

0
144

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या मुलीलाही कोरोेनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल इस्पितळामध्ये दाखल केले आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे, असे त्यांनी म्हटले आहे.