कर्नाटकची गोव्यावर कुरघोडी

0
92

सय्यद मुश्ताक अली आंतरराज्य दक्षिण विभागीय टी-२० स्पर्धेतील काल सोमवारी झालेल्या सामन्यात गोव्याला कर्नाटककडून ४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
बलाढ्य कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा चोपल्या. कर्नाटकच्या अचूक मार्‍यासमोर गोव्याला ८ बाद १२३ धावांपर्यंतच मजल मारता आली.

केवळ ९.४ षटकांत समर्थ (२८) व मयंक अगरवाल (५५) यांनी ९० धावांची सलामी दिल्यानंतर गोव्याच्या गोलंदाजांनी डावाच्या दुसर्‍या मध्यात तुलनेने चांगली गोलंदाजी करत कर्नाटकचा डाव मर्यादित ठेवला. दर्शन मिसाळ गोव्याचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २७ धावांत ३ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना गोव्याकडून कर्णधार सगुणने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. कर्नाटककडून मिथुन व अरविंदने प्रत्येकी २ गडी बाद केले. गोव्याचा दुसरा सामना आज हैदराबादशी होणार आहे.