खनिजवाहू ट्रकमालकांसाठी गोवा सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी योजना गोवा अर्बन बँकेने लागू न केल्याच्या निषेधार्थ काल कुडचडे, सांगें व सावर्डे या भागातील ट्रक मालकांनी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एम्. नारकर यांना त्यांच्या कॅबिनमध्ये घुसून घेराव घातला.वरील भागातील सुमारे ३० ट्रक मालकांनी हा घेराव घातला. खनिज उद्योग चालू असताना कधीही कर्जाचे हप्ते बुडवले नाहीत. आता खनिज उद्योग बंद असताना हप्ते कसे फेडावेत? शिवाय सरकारने कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे, असे या ट्रकमालकांचे म्हणणे होते. गोवा अर्बन बँकेने कर्जमाफीची योजना लवकर लागू करावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पत्र आल्याशिवाय बँक कर्जमाफी देऊ शकत नसल्याचे नारकर यांनी यावेळी स्पष्ट केले. हे घेराव नाट्य सुमारे अर्धा तास चालले.