कनेक्शन ट्रान्सफर न करता कुठेही घेता येईल गॅस सिलिंडर

0
133

केंद्र सरकारची नवीन योजना लवकरच
ग्राहकाला एकाच कार्डवर देशभरात कुठेही गॅस खरेदी करता येईल अशा नवीन योजनेचा आराखडा केंद्रीय ग्राहक मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय तयार करीत आहे. यामुळे दुसर्‍या ठिकाणी राहायला गेल्यानंतर नवीन रेशनकार्ड किंवा गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्याची यापुढे गरज भासणार नसल्याने ग्राहकांना सोसावे लागणारे त्रास वाचणार आहेत.सध्या ग्राहकांना एका शहरातून दुसर्‍या ठिकाणी गेल्यानंतर गॅस सिलिंडर ट्रान्सफर करण्यासाठी अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात. हे सोपस्कार पूर्ण करतेवेळी अनेक हेलपाटे मारावे लागत असल्याने ग्राहकांचा बराच वेळ खर्च होतो. केंद्र सरकारच्या नव्या योजनेमुळे वेळ तसेच सोपस्कार पूर्ण करण्यासाठी लागणारे त्रास कमी होणार आहेत. गॅस अनुदान ग्राहकांच्या खात्यात ट्रान्सङ्गर करण्यासाठी भरून घेतले जाणारे ङ्गॉर्म हॉकर त्यांच्या घरूनच भरून घेऊन जाणार आहेत. अशा स्थितीत सिलिंडर बुक केलेल्या ग्राहकांना गॅस एजन्सीमध्ये जावे लागणार नाही. एक जानेवारीपासून घरगुती सिलिंडरचे अनुदान थेट खातेधारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
३ दिवसांत पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट
केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार आता पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्जदाराला तीन दिवसांत अपॉइंटमेंट मिळेल. जर पासपोर्ट नूतनीकरणासाठी अर्ज केला असेल आणि पत्ता बदलण्यात आलेला नसेल तर यापूर्वी पोलिसांकडून करण्यात येणारी पडताळणी केली जाणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. सध्या अपॉइंटमेंटसाठी सात ते आठ दिवसांचा वेळ लागत होता.