कदंब वाहतूक मंडळाच्या नवीन 20 इलेक्ट्रिक बसगाड्यांचा शुभारंभ गुरुवार दि. 18 मे रोजी सकाळी 10 वाजता कुजिरा – बांबोळी येथे करण्यात येणार आहे. या नवीन 20 इलेक्ट्रिक बसगाड्या 9 मीटर लांबीच्या आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.