कथित धर्मांतर प्रकरणी 2 महिलांविरुद्ध गुन्हा नोंद

0
16

जुने गोवे पोलिसांनी चिंबल येथील कथित धर्मांतर प्रकरणी दोघा महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिंबल येथील एका कुटुंबाने दोन महिलांकडून धर्मांतर करण्यासाठी आमिष दाखविल्याची तक्रार केली आहे. सदर दोन्ही महिलांना स्थानिकांनी पकडले होते. तथापि, एका महिलेने पलायन करण्यात यश मिळविले. सदर दोन्ही महिला ताळगाव येथे राहत आहेत. या प्रकरणी जुने गोवा पोलीस तपास करीत आहेत.