>> श्रीशांतने केला आरोप
भारताचा माजी तेज गोलंदाज एस. श्रीशांतने भारतीय खेळाडूंवर टीका केली आहे. त्याच्या कठीण काळात त्याचे संघसाथी त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. ते त्याच्याकडे पाहत देखील नव्हते, असा आरोप त्याने एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.
श्रीशांतला पाहिल्यावर काही खेळाडू दूर राहण्याचा प्रयत्न करत होते. केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मणसह एक-दोन खेळाडू असे आहेत जे श्रीशांतबरोबर संपर्कात होते.
३७ वर्षीय श्रीशांतवर २०१३मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयने अजिवन बंदी घातली होती. परंतु गेल्याच वर्षी ही बंदी उठविण्यात आली. कठीण काळात अनेक खेळाडू आपल्या पाहिले तरी रस्ता बदलत असे, केवळ विरेंद्र सेहवाग व व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोन खेळाडू संपर्कात होते. तसेच गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली असून सचिनबरोबर ट्विटरवर बोलणे झाले होते. तसेच गंभीर, भज्जी यांना भेटलोही होतो, असे श्रीशांत पुढे म्हणाला.