औद्योगिक वसाहती दारूमुक्तची फाईल मंजूर ः उद्योगमंत्री राणे

0
108

राज्यातील सर्व औद्योगिक वसाहती दारूमुक्त विभाग जाहीर करणारी फाईल आपण काल मंजूर केली असल्याचे उद्योगमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. राज्यातील औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार तसेच सार्वजनिक हितासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे राणे म्हणाले. मद्यप्राशन करून कामावर येणार्‍या कामगारांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे दिसून आल्याने हा निर्णय घेतला आहे. ही फाईल बर्‍याच काळापासून अडून पडली होती. शेवटी जनहित व कामगारांची सुरक्षा ही सर्वांत मोठी आहे व त्यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
ही फाईल मंजूर केली जाऊ नये यासाठी काही घटकांकडून दबाव होता. मात्र, लोकहीत व कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन आपण या दबावाकडे दुर्लक्ष केल्याचे राणे यांनी सांगितले.