ओमिक्रॉनचे चोवीस तासांत भारतात १८० नवे बाधित

0
16

गेल्या २४ तासांत भारतात कोरोना विषाणूच्या नवीन ओमिक्रॉन प्रकाराची १८० नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण ओमिक्रॉनग्रस्तांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी भारतात कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची ९६१ प्रकरणे असून त्यापैकी ३२० रुग्ण बरे झाले असल्याची माहिती दिली.

भारतातील सुमारे ९० टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. याशिवाय पात्र वृद्ध लोकसंख्येला एसएमएस पाठवून १० जानेवारीपासून बूस्टर डोस घेण्यास सांगितले जाणार असल्याची महिती त्यांनी दिली.