ओडिशा रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयकडून स्थानक सील

0
6

ओडिशातील रेल्वे अपघाताची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) हाती घेतली असून पुढील आदेशापर्यंत बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही रेल्वेगाडी थांबणार नाही. ‘सीबीआय’ने हे स्थानक आपल्या ताब्यात घेत येथील ‘लॉग बुक’ आणि उपकरणे तपासासाठी जप्त केली असून रेल्वे स्थानक सील केले आहे. या रेल्वे स्थानकावर 2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू झाला होता, तर एक हजार 208 जण जखमी झाले होते. पुढील सूचना मिळेपर्यंत बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही प्रवासी रेल्लगाडी किंवा मालगाडी थांबणार नाही.

दरम्यान, रलगाड्यांच्या नियंत्रण यंत्रणा असलेल्या सर्व ‘रिले रूम्स’, रेल्वे फाटकांवरील सिग्निल्स व दळणवळणाची उपकरणे असलेले ‘रिले हट्स’ आणि ट्रॅक सर्किट सिग्नल यांच्यासाठी दुहेरी कुलुपाची व्यवस्था लागू करण्याचा आदेश रेल्वे बोर्डाने दिला.