पणजी (क्री.प्र.)
पहिल्या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या ‘ब’ विभागाचे विजेतेपद महाराष्ट्राच्या ओंकार काडव याने पटकावले. गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेच्या ‘ब’ विभाग स्पर्धा काल संपली. सातार्याच्या ओंकार याने १० पैकी ९ गुणांची कमाई केली. सरस टायब्रेकरच्या जोरावर त्याने विजय कुमारला दुसर्या स्थानी ढकलले. विजेत्याने १,४०,००० तर उपविजेत्याने १,१५,००० रुपयांची कमाई केली. शेवटच्या फेरीत ओंकारने ऋषभला तर विजयने के. प्रशांतला धक्का दिला. राहुल सोराम सिंग, उझबेकिस्तानचा साफारोव दोनिरोव व श्रीकांत के. यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळविला.
बक्षीस वितरण समारंभाला नेस्ले समुहाचे संजय भंडारी प्रमुख पाहुणे म्हणून तर डेल्टा कोरोचे विपणन व वितरण विभागाच्या उपाध्यक्ष तानिया अलुवालिया सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याव्यतिरिक्त अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार व स्पर्धा संचालक किशोर बांदेकर, आर्बिटर अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, संयोजक बाळकृष्णन व संजय बेलुरकर, गोवा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार विश्वास पिळणकर, उपाध्यक्ष आशिष केणी, वसंत नाईक, मायेश कांदोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. गोमंतकीय खेळाडू अनिरुद्ध भट ६.५ गुणांसह ५८व्या स्थानी राहिला. सर्वोत्तम गोमंतकीय खेळाडूचा पुरस्कार त्याला लाभला. अनिरुद्ध पार्सेकरने ७२वे व अन्वेश बांदेकरने ८८वे स्थान प्राप्त केले.
अन्य बक्षीसप्राप्त खेळाडू ः १०९९ रेटिंगखालील सर्वोत्तम ः १. यश उपाध्ये, २. यश परब, ३. सान्वी नाईक गावकर, ११९९ रेटिंगखालील सर्वोत्तमः १. जुर्गेन गोन्साल्विस, २. दुग्गिराला विवेक, ३. सिद्धार्थन आनंदन, १३९९ रेटिंगखालील सर्वोत्तम ः १. अन्वेश बांदेकर, २, कौस्तुभ मस्केपाटील, ३. आदित्य प्रसाद, १५९९ रेटिंगखालील सर्वोत्तम ः १. दशर्थी साहू, २. रोहित मोकाशी, ३. मंगल प्रसाद, १७९९ रेटिंगखालील सर्वोत्तम ः १. बी. सिरसईम, २. बिनायक रथ, ३. अभिजित जोगळेकर, सर्वोत्तम महिला ः १. भाग्यश्री पाटील, २. इश्वी अगरवाल, ३. सोवना सोनाली जेना, सर्वोत्तम व्हेटरन ६० वर्षांवरील ः १. युसी मोहनन, २. बिर सिंग रमिंदर, ३. कांतिलाल दवे, सर्वोत्तम बिगरमानांकित ः १. इलियास बार्रेटो, २. ध्यानकृष्ण शेट्टी, ३. निपुण दांगचे, सर्वोत्तम गोमंतकीय खेळाडू ः १. अनिरुद्ध भट, २. अनिरुद्ध पार्सेकर, ३. शेखर सिरसाट, सर्वोत्तम १५ वर्षांखालील ः १. दर्श कांसल, २. आकाश छाब्रा, ३. उज्ज्वल दीप, सर्वोत्तम १३ वर्षांखालील ः १. पंकज भट, २. अरुण कटारिया, ३. सूर्या राघव, सर्वोत्तम ११ वर्षांखालील ः १. गर्व राय, २. प्रेरक दर्वेकर, ३. अक्षित जैन, सर्वोत्तम ९ वर्षांखालील ः १. दैविक वाधवान, २. मुकुंद अगरवाल, ३. रघुराम रेड्डी, धक्कादायक निकाल ः वेद नार्वेकर, यश मनोज, विहान दुमिर, वेदांत नागरकट्टे व जुर्गेन गोन्साल्विस.