राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) अंतर्गत मतदारांना वितरित केलेल्या पुनरावलोकन अर्जांपैकी सुमारे 69.84 टक्के पुनरावलोक अर्ज 23 नोव्हेंबर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत परत गोळा करण्यात आले आहेत.
राज्यात बीएलओनी एसआयआरअंतर्गत सुमारे 11 लाख 85 हजार 034 मतदारांना पुनरावलोकन अर्जांचे वितरण करण्यात आले आहे. मतदारांनी पुनरावलोकनासाठी भरलेले अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बीएलओ मतदारांच्या घरी जाऊन अर्ज गोळा करीत आहेत. राजकीय पक्षांचे कार्यकर्तेसुद्धा पुनरावलोकन अर्ज गोळा करण्यासाठी मदत करीत आहेत. मतदार पुनरावलोकन अर्ज ईसीआयच्या पोर्टलच्या माध्यमातूनसुद्धा सादर करू शकतात.