‘एम्स’च्या स्थापनेसाठी प्रक्रिया सुरू ः राणे

0
139

गोव्यात ऑल इंडिया इन्स्टिटूट ऑफ मेडिकल सायन्सची (एम्स) स्थापना करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. आरोग्यमंत्री राणे यांनी एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया व इतर अधिकार्‍याची नवी दिल्ली येथे भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. यावेळी डॉ. प्रवीण अग्रवाल, डॉ. संजीव भोई, डॉ. तेज प्रकाश सीना आणि नोडल ऑङ्गिसर कीर्ती पांडे यांची उपस्थिती होती.

आमचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक राज्यात एम्स स्थापित करण्याच्या दृष्टिकोनाशी अनुरूप आहे, असेही राणे यांनी सांगितले. राज्यात अत्याधुनिक आपत्कालीन चिकित्सा सुविधा विकसित करण्यासाठी केरळ मॉडेलशी सुसंगत सामंजस्य करार करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.