एफसी गोवा-इंडिया अंडर-१९ फुटबॉल मित्रत्वाचा सामना उद्या टिळक मैदानावर

0
133

आयएसएल फ्रँचाइज एफसी गोवा संघ आपला दुसरा मित्रत्वाचा सामना, इंडिया अंडर-१९ संघाविरुध्द शनिवारी संध्याकाळी ४ वा. टिळक मैदानावर होईल.
बहुप्रतिक्षित आयएसएल येत्या दि.१२पासून सुरू होत असून फ्रँचाइज संघानी विविध फुटबॉल क्लबविरुध्द मित्रत्वाचे सामने खेळणे सुरू केले आहे. गोवा एफसीने आपल्या पहिल्या मित्रत्वाच्या सामन्यात सेझा फुटबॉल अकादमीवर ३-० असा विजय मिळविला होता.
ब्राझिलचे तीन विश्‍व चषकात प्रतिनिधीत्व केलेले अर्थुर अंतुनेस कोइम्ब्रा उर्फ झिको यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करून एफसी गोवाने फुटबॉलप्रेमीत औत्सुक्य जागविले आहे. झिको यांच्या मार्गदर्शनाखाली एफसी गोवाचा सराव सुरू असून त्यांच्या विलक्षण मार्गदशर्ंनावर बहुतेक सर्व खेळाडू जाम संतुष्ट आहेत.
फ्रान्सचा माजी आंतरराष्ट्रीय तथा आर्सेनलचा स्टार स्ट्रायकर रॉबर्ट पीरिससह नामवंत विदेशी खेळाडूंनाही गोवा एफसीने करारबध्द केले आहे. विदेशी खेळाडूबरोबरच राष्ट्रीय युवा खेळाडूंचाही संघात समावेश आहे. झिको यांच्या मार्गदर्शनाखालील युवा आणि अनुभवी खेळाडूंचा सुरेख समन्वय घडलेला गोवा एफसी संघ आयएसएलमध्ये ठसा उमटविण्यास उत्सुक असून या तयारीचा एक भाग म्हणून उद्या टिळक मैदानावर इंडिया अंडर-१९ संघाविरुध्द मित्रत्वाचा सामना होईल.