रात्री व दिवसाचे वेगवेगळे वीजदर
केंद्र सरकारने प्रचलित वीज दरप्रणालीमध्ये जे बदल केले आहेत त्या बदलांनुसार आता ग्रहकांना दिवसभरासाठी विजेचे दर समान असणार नसून ते दिवसाच्या वेळेनुसार बदलणार आहेत. ग्राहकांना आता दिवसा वापरणाऱ्या विजेसाठी कमी तर रात्रीच्या वेळी वापरणाऱ्या विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
राज्य वीज नियामक आयोगाने निश्चित केल्यानुसार आता दिवसातील सुमारे 8 सौर तासांदरम्यानचे दर हे सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्के एवढे कमी असतील. तर जेव्हा वीज जास्तीत जास्त वापरण्यात येत असते अशा वेळी हे दर 20 टक्के एवढे जास्त असणार आहेत.
अधिकृतरित्या देण्यात आलेल्या माहितीनुुसार 1 एप्रिल 2024 पासून कमाल 10 केडब्ल्यू आणि त्यापेक्षा जास्त मागणी असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी आणि 1 एप्रिल 2025 पासून कृषी ग्राहकांशिवाय इतर सर्व ग्राहकांसाठी हे नवे दर लागू होतील.
केंद्राकडून वीज ग्राहकांची गैरसोय व त्रास कमी करण्यासाठी ग्राहकांच्या मागणीत कमाल मंजूर विद्युत भार व मागणीपेक्षा जास्त वाढ करण्यासाठी सध्याचा जो दंड आहे तो कमी करण्यात आला आहे. मिटरिंग तरतुदींतील दुरुस्तीनुसार स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पूर्वीच्या कालावधीसाठी स्मार्ट मीटरद्वारे नोंदवलेल्या कमाल मागणीच्या आधारे कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाही.
स्मार्ट मीटर दिवसातून किमान एकदा दुरस्थपणे वाचले जातील आणि ग्राहकांना विजेच्या वापराबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्यास ‘डेटा शेअर’ केला जाईल. दिवसाचे 8 तास वीजदर सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्के कमी असतील. तर रात्रीच्या वेळचे दर 10 ते 20 टक्के एवढे जास्त असतील.