..अन्यथा ऊस उत्पादक रस्त्यावर उतरणार

0
2

>> ‘इथेनॉल’ प्रकल्पाची माहिती देण्याची शेतकऱ्यांची मागणी

सरकारने धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्प कधी होणार हे स्पष्ट करावे अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा काल या शेतकऱ्यांनी सरकारला दिला.
काल रविवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक सभा संपन्न झाली. या सभेत ऊस उत्पादकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी व्यासपीठावर ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, हर्षद प्रभुदेसाई, गुरूदास गाड, राजू गवळी, तसेच समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ऊस उत्पादक सुविधा समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर हे भाजप नेते असून ते शेतकऱ्यांबाबत ठोस असे निर्णय घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सुपटत नाहीत. त्यामुळे त्यांना समितीतून काढून टाकावे अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. याबाबत आम्ही सरकारला कळवणार आहोत असे ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

सरकारने कारखाना बंद करताना पुढील 5 वर्षांपर्यंत ऊस उत्पादकांना भरपाई देण्याची घोषणा केली होती. काही शेतकऱ्यांना पैसे दिले. मात्र198 शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नसल्याचे यावेळी नजरेत आणून देण्यात आले.
त्यावर उत्तर देताना समितीने याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो असून पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे पाठवून द्या असे मुख्यमंत्र्यांनी कळवले आहे अशी माहिती दिली.