एका कोरोना बळीसह नवे १५४ कोरोनाबाधित

0
12

राज्यात मागील चोवीस तासांत आणखी एका कोरोना बळीची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५८ एवढी झाली आहे. राज्यात नवीन १५४ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यापैकी तिघांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १०१३ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १४.०५ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १०९६ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. तसेच चोवीस तासांत आणखी १८० जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे आहे.