>> राज्य फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा
अव्वल मानांकित सासष्टी तालुक्याच्या इंटरनॅशनल मास्टर ऋत्विज परबने सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल गोवा राज्य फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा तथा राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या राज्य निवड स्पर्धेत काल तिसर्या दिवशी सहाव्या फेरीअंती एकट्याने आघाडी मिळविली आहे.
फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या परिषदगृहात खेळविण्यात येत असलेल्या स्पर्धेतील काल झालेल्या सहाव्या फेरीतील लढतीत ऋत्विजने पीएम कंटकचा पराभव केला. पीएम कंटकरवील विजयामुळे ऋत्विजचे ६ गुण झाले आहेत. निरज सारिपल्ल, नंदिनी सारिपल्ली आणि देवेश आनंद नाईक हे ५.५ गुणांसह संयुक्त दुसर्या स्थानी आहेत. निरज सारिपल्लीने आर्यन रायकरचा पराभव केला. नंदिनी सारिपल्लीने साईराज वेर्णेकरवर मात केली. देवेश नाईकने मनोहर लाडला पराभूत केले.
रुबेन कुलासो, विवान बाळ्ळीकर आणि सुहास अस्नोडकर हे सहाव्या फेरीअंती ५ गुणांवर आहेत.
स्पर्धेत एकूण १६९ खेळाडूंनी सहभाग घेतला असून चेस गुरु अकादमीने ही स्पर्धा पुरस्कृत केलेली आहे.