निवडणूक अधिकारी कुणाल यांचे भाजपला झुकते माप : कॉंग्रेस

0
119

गोव्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल पक्षपातीपणा करून भाजपला झुकते माप देत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे माध्यम विभागाचे समन्वयक ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. येत्या १९ मे रोजी होणारी पोट निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांच्या जागी निःपक्षपाती काम करू शकणार्‍या अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी मागणी डिमेलो यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

पणजी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा पराभव निश्‍चित असल्याने भाजप नेते वैफल्यग्रस्त बनले असून मुख्य निवडणूक अधिकार्‍याला हाताशी धरून मतदानाच्या दिवशी गैरप्रकार करू शकतात, असा संशय डिमेलो यांनी व्यक्त केला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेल्या २ मे रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.