उरणमध्ये विद्यार्थ्यांना दिसले सशस्त्र संशयित दहशतवादी

0
54

>> मुंबईत हाय अलर्ट जारी

 

रायगड जिल्ह्यातील उरण येथील नौदलाच्या तळाजवळ शालेय विद्यार्थ्यांना सशस्त्र पाच संशयित दहशतवादी दिसल्याने भारतीय नौदलाने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. संशयित दिसलेले ठिकाण नौदलाच्या युद्ध सामग्रीचे भंडार व आयएनएस अभिमन्यूपासून अत्यंत जवळ आहे.
युईएस शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना काळे पठाणी कपडे घातलेले पाच-सहा संशयित दहशतवादी खांद्यांवर बॅगा व शस्त्रांसह दिसल्याचे मुख्याध्यापकांना सांगितले. यानंतर पोलिसांना कळविल्यानंतर नौदलाने हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली आहे. फोर्सवन युनिटही उरणकडे रवाना झाले आहे.
नौदलाच्या वेर्स्टर्न कमांडने मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड किनारपट्टीवर हायअलर्ट जारी केला आहे. एटीएसचे अधिकारीही उरणमध्ये पोहोचले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव शाळा, कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. शहरात जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.