उमेदवारी अर्जांचा ओघ वाढला

0
28

>> तिसर्‍या दिवशी २०३ अर्ज दाखल

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी २०३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तीन दिवसांत २८३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत निवडणुकांसाठी पहिला दिवशी १० अर्ज, दुसर्‍या दिवशी ७० अर्ज आणि तिसर्‍या दिवशी २०३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

तिसर्‍या दिवशी उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातून १६, डिचोलीतून १०, बार्देशमधून २९, सत्तरीतून १२ आणि तिसवाडीतून १८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दक्षिण गोव्यातील ङ्गोंडा तालुक्यातून १४, धारबांदोड्यातून ३, सांगेतून ७, सासष्टीतून ६४, मुरगावातून १६, केपेतून ७ आणि काणकोणातून ७ अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.