उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल प्रकरणी गोवा फॉरवर्डच्या महिला शाखेने येथील महिला पोलीस स्टेशनवर काल तक्रार दाखल केली आहे. व्हिलेजीस ऑफ गोवा या व्हॉट्सअप ग्रुपवर कवळेकर यांनी एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केला आहे. या ग्रुपवर अनेक महिलांचा सुद्धा समावेश आहे. महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, आपला मोबाईल क्रमांक अज्ञात व्यक्तीने हॅक करून एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाकडे काल केली आहे. आपण झोपलेलो असताना मोबाईल क्रमांक हॅक करून हा व्हिडिओ ग्रुपवर टाकण्यात आला आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.