उपमुख्यमंत्रिपद व १३ मंत्रिपदांचा भाजपकडून शिवसेनेला प्रस्ताव

0
146

महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेसमोर सत्तावाटपाचे नवीन समीकरण ठेवले असून त्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह इतर १३ मंत्रिपदांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा या मागणीवर शिवसेना आग्रही असतानाच, भाजपने हा नवा प्रस्ताव ठेवला आहे. यात मुख्यमंत्रिपद आणि अन्य २६ मंत्रिपदे ही भाजपकडेच राहतील असे म्हटले आहे. मात्र यावर शिवसेनेने अद्याप कोणतीच भूमिका जाहीर केलेली नाही.

विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप-शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असून शिवेसना लोकसभा निवडणुकीवेळी ५०-५० या फॉर्म्युल्यावर ठाम आहे. मात्र असा फॉर्म्युला ठरलाच नव्हता असे मुक्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मंगळवारी होणारी शिवसेना-भाजपची बैठकही उद्धव ठाकरे यांनी रद्द केली होती. मात्र शिवेसनाही अद्याप त्याच फॉर्म्युल्यावर ठाम आहे. त्याचवेळी भाजपकडून उपमुख्यमंत्री पद आणि १३ मंत्रिपदांचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपच्या विधिमंडळ गटाचे नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी फडणवीस यांनी राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.