संपूर्ण देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणात माजी भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर दोषी ठरला आहे. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हा निकाल दिला असून दि. १९ रोजी त्याच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. शशी सिंह या अन्य आरोपीची न्यायलयाने सुटका केली. इन कॅमेरा या खटल्याची सुनावणी घेण्यात आली. बलात्कार पीडितेची जबानी नोंदवण्यासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातही विशेष सुनावणी घेण्यात आली. तिथे तिच्यावर उपचार सुरु होते. कुलदीप सिंह सेंगरची भाजपामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.