उद्धव ठाकरेंचा गोवा दौरा २२ पासून

0
86

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला गोवा दौरा पुढे ढकलला आहे. आज १५ रोजी त्यांचे गोव्यात आगमन होणार होते. मात्र, ब्रिक्स राष्ट्रीय परिषद असल्यामुळे त्यांना आपले खासगी विमान घेऊन गोव्यात येण्यास परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी आपला गोवा दौरा आता दि. २२ रोजी ठेवला आहे. त्यामुळे ते आता १५ ते १७ ऐवजी २२, २३ व २४ रोजी गोव्यात असतील, अशी माहिती शिवसेना राज्य प्रमुख सुदीप ताम्हणकर यांनी काल पत्रपरिषदेत दिली.