उत्पल पर्रीकर निवडणूक लढवणार

0
26

गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, भाजपकडून आपल्याला उमेदवारी मिळेल, असा विश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी आपण भाजपसोबत चर्चा करत असून, पक्ष आपल्याला उमेदवारी देईल, असे त्यांचे म्हणणे आहे. आपण पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला असून, या मतदारसंघातील लोकांबरोबर आपले चांगले संबंध असल्याचेही ते म्हणाले.