दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हरयाणा, राजस्थान आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत या सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 40 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाने झोडपून टाकले आहे. पावसाचा जोर काल देखील कायम राहिला. याच पार्श्वभूमीवर काल दिल्लीतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने येत्या 15 जुलैपर्यंत शाळा बंद राहतील अशी सूचना दिली आहे. तसेच हिमाचल प्रदेशात 11 जुलैपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पंजाबमधील शाळाही 13 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.