उत्तर प्रदेशसह अन्य चार राज्यांची आज मतमोजणी

0
90

उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब व मणिपूर या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे. निकालांना आता अवघे तास उरले असल्याने विजयाचे रंग कोण उधळणार याकडे लक्ष लागले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड व गोव्यात भाजपला चांगले यश मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला असल्याने उत्कंठा शिगेला पोचली आहे. एक्झिट पोलमध्ये चार राज्यांत भाजप मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पंजाबमध्ये आप मुसंडी मारणार असल्याचा अंदाज व्यक्तविण्यात आला असल्याने आपने विजयी जल्लोषाची तयारी सुरू केली आहे.