उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदाराचा कोरोनाने मृत्यू

0
154

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनामुळे आणखी एका भाजप आमदाराचा मृत्यू झाला आहे. रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. दल बहादूर कोरी यांना एका आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. काल शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. यापूर्वी ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.