उत्तर प्रदेशमध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी आज मतदान

0
24

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान आज दि. १४ फेब्रुवारी रोजी होत आहे. एकूण ७ टप्प्यांत उत्तर प्रदेशमध्ये मतदान होत असून आज ९ जिल्ह्यातील ५५ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण ५८६ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. १२५३८ मतदान केंद्रांवर मतदानाची पक्रिया पार पडेल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.