उत्तर प्रदेशमधील ‘इंडिया’च्या प्रचारसभेत गोंधळ

0
11

जमावाने बॅरिकेड्स तोडले, राहुल, अखिलेश भाषण न करताच गेले

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये इंडिया आघाडीची काल जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या सभेत जमाव नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला व राहुल गांधी व अखिलेश यादव हे कोणतेही भाषण न करता तेथून निघून गेले. यावेळी मंचाभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडत जमावाने स्टेजकडे गर्दी केली होती. त्यामुळे प्रचंड गोंधळ माजला. अखेर राहुल गांधी आणि अखिलेश यादव हे कोणतेही भाषण न करता व्यासपीठावर 10 ते 12 मिनिटे चर्चा करून निघून गेले. फुलपूर लोकसभा मतदारसंघात राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती.

फुलपूर लोकसभा मतदारसंघात संयुक्त निवडणूक प्रचारासाठी आलेले राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या बैठकीत रविवारी मोठी गर्दी झाली. सपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुरक्षेसाठी बांधलेले बॅरिकेड्‌‍स तोडून मंचाजवळ पोहोचले. यावेळी एकीकडे मंचावर नेत्यांची भाषणे सुरू होती, तर दुसरीकडे खाली गोंधळ सुरू होता. गोंधळामुळे राहुल आणि अखिलेश तेथून निघून गेले.

दरम्यान, फुलपूर येथे इंडिया आघाडीतर्फे संयुक्त रॅली काढण्यात आली. राहुल गांधी व नंतर अखिलेश यादव मंचावर आले. त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांना मंचावर चढायचे होते. त्यांनी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्सही तोडले. हातात सपा आणि काँग्रेसचे झेंडे फडकावत या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर राहुल व अखिलेश तेथून निघून गेले.