उत्तर गोवा कोमुनिदादच्या समित्यांची निवडणूक लांबणीवर

0
6

उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासकांनी नवीन कोविड नियमावलीमुळे बार्देश, पेडणे आणि डिचोली तालुक्यातील कोमुनिदाद समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. सभागृहात ५० टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. कोमुनिदाद निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने भागधारक उपस्थित राहणार असल्यामुळे २७ कोमुनिदाद समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. ही निवडणूक १६ जानेवारी २०२२ रोजी घेतली जाणार होती. यासंबंधीचा आदेश प्रशासक सागर गावडे यांनी जारी केला.