उत्तर काशीमध्ये बस अपघात; 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी

0
36

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भीषण अपघात झाला असून गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक प्रवासी बस दरीत कोसळली. अपघातावेळी बसमध्ये 35 प्रवासी होते, त्यापैकी किमान 7 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 27 प्रवासी जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी गुजरातचे रहिवासी आहेत. यात्रेकरुंनी भरलेली ही बस गंगोत्रीहून प्रवास करुन परतत असताना वाटेत त्यांचा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. उत्तरकाशी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक आणि जिल्हा दंडाधिकारीही घटनास्थळी हजर आहेत. गाडीत सुमारे 35 जण होते. 27 जखमींना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.