उत्तराखंडचे राज्यपाल अझिज कुरेशी यांना पदाचा राजीनामा देण्यासाठी धमकवल्याप्रकरणी काल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. कुरेशी यांना केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी राजीनामा देण्यासाठी धमकावले अन्यथा काढून टाकण्यात येईल, असे सांगितल्याची तक्रार आहे. यूपीएकाळातील दोन राज्यपालांना केंद्राने काढले असून चौघांनी राजीनामे दिले आहेत.