उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांकडे राजीनामा

0
83

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी काल मंगळवारी दुपारी आपला राजीनामा राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे सोपवला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
उत्तराखंडचे मुख्यमंत्रिपद मिळणे हे माझे सौभाग्य होते. एवढा मोठा सन्मान मला पक्षाकडून मिळेल असा विचारही मी कधी केला नव्हता. मुख्यमंत्री कार्यकाळाला चार वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ नऊ दिवस बाकी आहेत. परंतु, आता मुख्यमंत्री बनण्याची संधी दुसर्‍यांना द्यावी, असे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. यानुसार मी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला आहे.

मुख्यमंत्री रावत यांच्यावर भाजपचे अनेक आमदार नाराज होते. तसेच रावत यांच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडात २०२१ साली होणार्‍या विधानसभा निवडणुका झाल्या तर पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून रावत यांना हटवण्यात येणार असल्याचा अंदाज होता.