उत्तरप्रदेशातील रेल्वे अपघातात चार प्रवासी ठार

0
10

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या रेल्वेचा काल भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये रेल्वे 10 डबे रुळावरून घसरले. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, तर तर 20 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
काल दुपारी 2.30 च्या सुमारास हा अपघात झाल्याचे एका प्रवाशाने सांगितले. ही रेल्वे चंदीगडहून दिब्रुगडला जात होती. गोंडा स्थानकातून बाहेर पडून 20 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर झिलाही स्थानकात पोहोचण्यापूर्वी ही रेल्वे रुळावरून घसरून हा अपघात झाला. रेल्वेचे आठ ते दहा डबे रुळावरून घसरले. गोंडा-गोरखपूर रेल्वे सेक्शनवरील मोतीगंज आणि झिलाही रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला.