ईफ्फी उद्घाटन सोहळा व्यवस्थापनासाठी निविदा जारी

0
304

पणजी (प्रतिनिधी)
महोत्सवासाठीच्या उद्घाटन आणि सांगता सोहळ्यासाठी कार्यक्रम व्यवस्थापन एजन्सीची निवड करण्यासाठी निविदा जारी करण्यात आली आहे.
येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान ४९ व्या इफ्फीचे आयोजन केले जात आहे. या महोत्सवात ६४ देश सहभागी होणार आहे. महोत्सवासाठी प्रतिनिधी नोंदणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन व समारोप सोहळा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. चित्रपट तज्ञ आणि सिनेप्रेमींसाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क आकारले जाणार आहे, तर विद्यार्थी प्रतिनिधी नोंदणी विनाशुल्क असणार आहे. संबंधितांनी इफ्ङ्गीच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कंट्री ङ्गोकस असलेल्या इस्राईलचे सहा ते सात चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात येतील. तसेच सिनेमा ऑङ्ग द वर्ल्ड विभागात जगभरातील ६४ देशांतील चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.